Wednesday, 28 February 2018

Logo

विज्ञान गीत

डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥धृ.॥
भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले
प्रारंभी जे अदभूत वाटे गहन, भितीदायी
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || १ ||
वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा
बीज पेरता कसे उगवते, पाऊस येई कसा
चारा चरूनी शेण होतसे, शेणाचे खत पिका
पीक पेरता फिरूनी चारा, चक्र कसे हे शिका
जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || २ ||
अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार
सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार
या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे
बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे
विज्ञानाची दृष्टी वापरा, स्पर्धेमध्ये टीका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || ३ ||

Monday, 26 February 2018

माझी मराठी

*माय मराठी*
                        ✍🏼  श. गार्डी

*माझ्या मराठीची थोरवी*
*कशी वर्णू मी शब्दांत,*
*आईपरि स्थान तिचं*
*जपलेलं ह्दयात ...*

*संत-कवी-साहित्यीकांची*
*कितीतरी मांदियाळी,*
*मायमराठीची सेवा*
*लिहलेली त्यांच्या भाळी...*

*शब्दाशब्दांतून पाझरे*
*मायाममतेचे झरे,*
*किती करु कौतुक*
*हाती शब्द न उरे...*

*माझ्या मराठीचा वेलू*
*गगनाला गेला,*
*परि मुळापाशी इंग्रजीनं*
*घातला अलगद घाला...*

*माझ्या मराठीचा वाजे*
*अवघ्या जगामंधी डंका,*
*परकीय भाषेची*
*चला पेटवूया लंका...*

*मराठीला जपणं*
*आहे तुझ्याचं रे हाती,*
*ध्यानी ठेवून जपूया*
*जन्मोजन्मीची रे नाती...*

*मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !*