Friday, 9 March 2018

सेवा जेष्टता

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई* कडून सर्व *पदवीधर डी. एड् शिक्षकांना आवाहन*

*मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने  दि१४-११-२०१७  चे परिपत्रका नुसार सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतचा स्पष्टीकरणात्मक काढलेला आदेश व अनुसुची "फ" बाबत*
*स्पष्टीकरण आपल्या आकलनासाठी देत आहोत .........*
*मुद्दा क्र.1* --  ज्या दिवशी SSC DEd शिक्षक हे *BA*पदवी धारण करतील , त्याच दिवशी ते *B. A. BEd स्केल साठी पात्र होतील.फ़क्त सदर शाळा / संस्था मध्ये प्रशिक्षित पदवीधर म्हणजे B. Ed. चे पद रिक्त असणे आवश्यक आहे.मात्र पद अथवा वेतनश्रेणी तसेच वरचे वर्ग अध्यापनासाठी मिळाले नाहीत तरी अशा पदवीधर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळू शकते. हे मा. न्यायालयीन निर्णयानुसार सिद्ध झाले आहे. दि. 13/10 /2016 च्या शासननिर्णयानुसार पदवीधर याचा अर्थ कोणत्याही शाखेतील पदवी अधिक  D. Ed.  किंवा B. Ed. असा आहे, हे स्पष्टपणे नमूद केले आहे. म्हणजेच पदवीधर डी. एड्. शिक्षक हा बी. एड्. समकक्ष* समजला जातो.
*मुद्दा क्र.2* --  इयत्ता  ५ वी ते 10 वीचे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळेत  / संस्थेत सेवेत असणार्‍या सर्वच डी. एड्. व बी. एड् सह रुजू होणार्‍या सर्वच शिक्षकांची एकच एक प्रथम नेमणूक दिनांकानुसार जेष्ठता यादी बनवावी , ह्याच यादीनुसार जो जेष्ठ शिक्षक त्यास उपमुख्याध्यापक /मुख्याध्यापक पदी पदोन्नति द्यावी. DEd साठी BA कधी केले अथवा BEd स्केल कधी मिळाले महत्वाचे नाही , कारण schedul B प्रमाणे SSC D. Ed हे सहा.शिक्षका साठी full fill qualification आहे .दि. *24/1/2017 च्या शासननिर्णयानुसार पदवीधर शिक्षकांच्या जेष्ठतासूचीबाबत मुद्दा क्रमांक 2 मध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षकांची जेष्ठता यादी करताना मूळ नियुक्ती दिनांकानुसार जेष्ठता निश्चित करावी, हे स्पष्टपणे नमूद केले आहे*
*मुद्दा क्र.3* -- प्रमाणे पदोन्नती साठी SSC. D. Ed शिक्षकांनी B. A. /B. Com. /B. Sc. पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. B. Ed. पदवी केव्हा प्राप्त केली हे महत्वाचे नाही.*नेमणूक दिनांक पदोन्नतीसाठी महत्वाचा आहे*.
*मुद्दा क्र.4*-- प्रमाणे प्राथमिक शिक्षक (SSC DEd ) हा पदवी प्राप्त केल्या दिनांका पासून प्रशिक्षित पदवीधर म्हणून समजला जाईल .तसेच त्याचा अखंड सेवेतील  मुळ नियुक्ती दिनांकच (DEd/BEd) त्याचापदोन्नतीसाठी जेष्ठतेचा दिनांक असेल.
*मुद्दा क्र.5* -- शिक्षक संवर्ग - - इयत्ता 5 ते 10 - तसेच 12वी  वर्ग असणारी माध्यमिक शाळेतील  (D. Ed/B.Ed) प्रथम नियुक्ति व अखंड सेवा प्रमाणे असणारी सामाईक जेष्ठता यादी ( D. Ed/B. Ed ) अर्हता असणारे सर्व  इयत्तांना (5 ते ई.10 -- 12 ला) शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची.सदर जेष्टता यादी ही फ़क्त नेमणूक दिनांक प्रमाणेच करावी.म्हणजे ज्याची नेमणूक आधी तो जेष्ठ असेल.( मग तो प्रथम नेमणूक वेळी D. Ed असो अथवा BEd) परंतु पदोन्नतीचे पद रिक्त होण्यापूर्वी तो , पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. (म. खा. शा. नियमावली 1981 नियम क्रमांक, 3 नुसार ) जो नेमणूक दिनांकाप्रमाणे जेष्ठ शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असेल.
*मुद्दा क्र.6*-- महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती 1981 च्या schedule F नियम 12 प्रमाणे 'क' संवार्गा साठी आवश्यक अर्हता -- B. A /B.COM/ B. Sc. /B. Ed
*अर्हता क्र.3* -- B. A /B. COM/ B. Sc/Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम)
*अर्हता क्र.4*-- B. A /B.COM/ B. Sc / S. T. C. / Dip.ed.( एक वर्षाचा अभ्यासक्रम किंवा तत्सम अभ्यासक्रम 'क' संवार्गात समाविष्ट होण्यासाठी 10 वर्ष सेवा होणे आवश्यक.
टीप क्रमांक -- 2  (पहाणे आवश्यक)
या टिप -- 2 चा संबंध अर्हता क्र. 3 शी आहे. यातील Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम) हा D. Ed (दोन वर्षांचा अभ्यासक्रम ) ला समकक्ष आहे.( टिप -- 2 पहा)
*अर्हता क्र.4* मधील व्यवसायिक पात्रता ही 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या 1 वर्ष अभ्यासक्रमलाच फ़क्त 10 वर्ष सेवेची अट आहे . दोन वर्ष सेवेसाठी नाही.(म्हणजे अर्हता क्र.3 ला नाही. टीप क्र. -- 2 पहा. *कारण टीप-- 2 प्रमाणे SSC नंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम हा प्रशिक्षणविषयक अर्हता असून जेष्ठतेच्या प्रयोजना साठी राहील हे स्पष्ट म्हटले आहे*.)
दुसरे असे, की महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने 1978 साली Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम) आणि STC , Dip.ed (एक वर्षाचा अभ्यासक्रम) हे बंद करून एकच D. Ed( दोन वर्षांचाअभ्यासक्रम) 1979 पासून सुरु केला आणि हा अभ्यासक्रम Dip.t ( दोन वर्ष अभ्यासक्रम ला समकक्ष आहे ( पहा -- टिप 2)
*मुद्दा क्र. 7* पदोन्नतीसाठी  इयत्ता 5 ते 10 किंवा 12  पर्यंत वर्ग असणार्‍या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेची(D. Ed. /B. Ed. ) एकच सामाइक सेवाजेष्ठता यादी नियुक्ती दिनांका प्रमाणे असावी.
प्रथम नियुक्ती दिनांक, अखंड सेवा पात्र असलेला शिक्षक मुख्याध्यापक पदी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल.
सदर GR हा D. Ed. /B. Ed नेमणूक दिनांका प्रमाणे जेष्ठतेबाबत मार्गदर्शक व परिपूर्ण आहे.या पूर्वी पदोन्नती देताना प्रथम बी. एड् झालेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्याची रूढ पद्धत बदलणार आहे. यापुढे सर्व पदोन्नती दि.१४-११-२०१७ च्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार होणे अपेक्षित आहे.या निर्णायाने मोठी उलथापालथ होत असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.भविष्यातील अनेक न्यायालयीन प्रकरणांना आळा बसेल. *

59 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सर या आदेशाला स्थगिती आली आहे का?
    कळावे
    9890826064

    ReplyDelete
  3. सर Ded शिक्षकांना Ded मधून Bed मध्ये प्रमोशनने वरच्या श्रेणीत आणले म्हणजे प्रमोशन किती वेळा घेता येतो हे स्पष्ट करण्यात आलेले नाही कृपया हे स्पष्ट करण्यात यावं.

    ReplyDelete
  4. १४/११/२०१७ चे परिपत्रक उपलब्ध होईल का?

    ReplyDelete
  5. उपलब्ध झाल्यास 8605342424 या मोबाईवर व्हाट्स अॅप करावे ही विनंती

    ReplyDelete
  6. अर्ध वेळ सेवा सेवाजेष्टतेसाठि ग्राह धरतात काय

    ReplyDelete
    Replies
    1. सर नमस्कार अरधवेळ सेवा जेष्ठतेबाबत काही जी आर असेल तर कृपया पाठवा 9767636733

      Delete
    2. अर्धवेळ शिक्षक सेवेला आरक्षण लागू नसल्यामुळे असी सेवा सेवाजेष्ठतेसाठी ग्राह्य धरता येत नाही. पदोन्नतीसाठी तरी नाहीच नाही. कारण पदोन्सानतीसाठी अखंड सेवेची अट आहे. नियमानुसार अर्धा वेळ सेवा संपुष्टात आणून संस्था पूर्णवेळ शिक्षकाची नियुक्ती देते व त्याला शिक्षणाधिकारी पुन्हा एकदा रितसर मान्यता देतात. माझा मुद्दा मान्य नसेल तर आपला खुलासा मांडा व शासन परिपत्रक असेल तर त्याचा संदर्भ टाका. 🙏🙏🙏

      Delete
  7. To become Teacher for sec. Section . He should be B.ed and for jr.College M.a./ M.sc./ M.com(50%) B.ed. so how can s.s.c./ H.s.c./ B.a./ d.ed. Teacher became their pricipaloror H.m...

    ReplyDelete
  8. सर मी मागील वर्षी अतिरिक्त शिक्षक म्हणून दुसर्या शाळेत रुजू झालो आहे.आधीच्या शाळेत २१ वर्षे सेवा झाली आहे.त्यात कोणताही खंड पडलेला नाही. कृपया मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.

    ReplyDelete
  9. 29/10/2018 चा सुप्रिम कोर्टाचा निकाल बी.एड.च्या बाजूचा आहे

    ReplyDelete
  10. शासन फक्त भांडन लावण्याचे काम करीत आहे
    परिपत्रक कायद्याला धरुन नाहि
    हे सर्व विनोदाची विनोदी कारकिर्द

    ReplyDelete
  11. मंत्री व सचिवाचा अजब कारोभार

    ReplyDelete
  12. शिकवायला वर्ग नको बसायला खुर्ची पाहिजे

    ReplyDelete
  13. डि एड बी एड पदविधारकांचे 10 वी,12 वी तसेच पदवीच्या गुणांची तुलना करा मग लक्षात येईल कोण पात्र आहेत ते?

    ReplyDelete
  14. Plz send m the GR of graduate teachers seniority

    ReplyDelete
  15. जर HSC D.ED.शिक्षकाने सेवेत रूजू झाल्यावर शैक्षणिक पात्रता वाढवली तर त्याची वेतनश्रेणी वाढते काय?
    कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  16. एखादा सेवक बी एड असेल तर त्यास पदोन्नती देणार का?

    ReplyDelete
  17. Sir can you please give explanation about the decision given by high court on 9th April 2019 related to seniority

    ReplyDelete
  18. सर आपण म्हणता की SSC Ded शिक्षक ज्या दिवशी पदवी पूर्ण करेल तेच Bed स्केल सुरू करावे, मग जो शिक्षक MA Bed आहे, पण Ded स्केल वर काम करतो मग त्याला Bed स्केल का मिळत नाही

    ReplyDelete
  19. मुद्दा क्र.2* -- इयत्ता ५ वी ते 10 वीचे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळेत / संस्थेत सेवेत असणार्‍या सर्वच डी. एड्. व बी. एड् सह रुजू होणार्‍या सर्वच शिक्षकांची एकच एक प्रथम नेमणूक दिनांकानुसार जेष्ठता यादी बनवावी , ह्याच यादीनुसार जो जेष्ठ शिक्षक त्यास उपमुख्याध्यापक /मुख्याध्यापक पदी पदोन्नति द्यावी.



    Gr असेल तर मला WhatsApp 8390813957 kra

    ReplyDelete
    Replies
    1. सर मला देखील पाहिजे होता Gr. मिळेल का ?

      Delete
  20. जूना अभ्यासक्रमडी.एड् पूर्ण केले आहे.या डी.एड् वरून प्रथम वर्ष बी.ए. प्रवेश घेता येईल का ? तसे असेल तर परिपत्रक किंवा शासन आदेश आहे का ? आदेश असेल तर9421124368या send करा

    ReplyDelete
  21. सर आमच्या संस्थेतील बहुतेक शिक्षक संस्था प्रवेश करताना मुळातच बीए बीएड असून काही वर्षे डिएड वेतनश्रेणीत सेवा केलेली आहे.सेवाजेष्ठते विषयी मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.मोबाईल नंबर ९८८१३०२८९२

    ReplyDelete
  22. एका शिक्षकाचा ,उपशिक्षक,,, ते मुख्यद्यापक परत उपशिक्षक ,,,तेव्हा यांची सेवा जेष्ठता जाईल की पूर्वी शिक्षक म्हणून होती तीच राहील,, ,मार्गदर्शन व्हावे ,,,7875139210

    ReplyDelete
  23. मला नेहमी असं वाटते माध्यमिक शाळेतील डीएड शिक्षकांना नेहमी कमी दर्जाच लेखलं जातं भलेही त्यांच qualification नंतर एम ए बीएड झाल असल तरी

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे
      जर कृपया सेवाज्येष्ठता gr असेल तर पाठवा कुणीतरी

      Delete
  24. डी एड शिक्षक वेतनश्रेणी लागू असल्याने तो बी एड श्रेणी वर कधी गेला हा नियम लागू होत आहे त्यामुळे जे अगोदर पासून बी एड श्रेणी वर काम करतात तेच सेवाज्येष्ठता साठी पात्र आहेत हे बरोबर आहे उगाच लोकांना confuse करण्यात काही अर्थ नाही

    ReplyDelete
  25. एम बीएड जरी एकादा असला तरी तो बी एड स्केल वर कधी गेला ही तारीख महत्वाची आहे म्हणून बी एड श्रेणी वर जे अगोदर पासून कार्यरत आहेत त्यांना सेवाज्येष्ठता देणे बंधनकारक आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सर या संदर्भात जी. आर.असेल तर पाठवा.
      मोबाईल नंबर 9422433569

      Delete
  26. जरी एकादा शिक्षक एम ए बी एड आहे पण तो जर तो डी एड श्रेणी वर काम करत आहे तर तो बी एड श्रेणी वर कधी गेला ती तारीख महत्वाची आहे म्हणून जे अगोदर पासून बी एड श्रेणी वर काम करतात तेच सेवाज्येष्ठता साठी पात्र आहेत हे लक्षात ठेवा

    ReplyDelete
  27. सर मी 13/06/2004 पासुन कायम विनाअनुदानित तुकडीवर सेवेत लागलो आणि एक शिक्षक 1/12/2004 रोजी त्याच शाळेत अनुदानित तुकडीवर सेवेत रुजू झाला त्यानंतर मी2008 साली अनुदानित वर आलो माझी सेवा विनाअनुदानित व अनुदानित अशी अखंडीत सेवा आहे तर आमच्यातील सेवाजेष्ट कोण ठरेल?
    संपर्क 7276314250

    ReplyDelete
  28. सर मला २०१२ लागेल निवडश्रेणी मिळाली.३१ मे २०२०ला माझे बेसिक ७६५०० लेवल १७
    , स्तर १७ ,ग्रेड पे ४८०० असा आहे.तर ०१ जून २०२० ला मला मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली. तर जून २०२० चे बेसिक पे किती असेल व १जुलै २०२० चे बेसिक किती असेल. कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.

    ReplyDelete
  29. नमस्कार सर जर एखादा शिक्षक डीएड नियुक्त असेल तो बीए पूर्ण असेल आणि त्याची सेवा दहा वर्षे पूर्ण झाले असेल
    तर तो सेवा जेष्ठता यादी मध्ये ई प्रवर्गा मधून क प्रवर्गामध्ये समाविष्ट होतो का? यासंदर्भात नियम व शासन निर्णय असेल तर कृपया माझा व्हाट्सअप नंबर 99 60 64 0111 वरती पाठवावा ही नम्र विनंती

    ReplyDelete
  30. सगळे गचाळ राजकारण करतात
    Diploma आणि Degree यातला फरक कळत नाही आणि निघाले मुख्याध्यापक व्हायला

    ReplyDelete
  31. Vina anudanit shalala anudan alya nantar vetan kontya shikshakacha pagar adhi kadhava ya vishayi margadarshan va jr.asel tar pathava

    ReplyDelete
  32. मी एक विनाअनुदानित शिक्षक असून 10 जून 2004 रोजी पूर्णवेळ पदावर नियुक्त्या आहे याच संस्थेच्या अनुदानित शाळेत एक शिक्षक 1999 मध्ये अर्धवेळ नियुक्त आहे. जो 2002 मध्ये पूर्ण झाला. सेवा जेष्ठता यादीत सेवा जेष्ठ कोण? कृपया मार्गदर्शन व्हावे. मो नं.9326981606

    ReplyDelete
  33. नमसकार सर मी एस.टी. संवर्गातीलअसून माझी नियुक्ती डी. एड. शिक्षक म्हणून करण्यात आली होती.माझा सेवाकाल 15 वर्षे झाला असून संस्थेत रोस्टर नुसार एस.टी.संवर्गाचे मुख्याध्यापकाचे रिक्त असलेल्या पदावर मला दि.2/12/2017 ला पदोन्नती दिली होती परंतु 29/9/२020 ला मला पदावन्नत करण्यात आले यासंदर्भात नियम व शासन निर्णय असले तर कृपया माझा व्हाट्सएपच्या नंबर 9763425519 वरती माहिती पाठवावी ही नम्र विनंती

    ReplyDelete
  34. नमस्कार सर����

    मी एका संस्थेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे.आमच्या संस्थेच्या एकूण तिन शाळा आहेत. तिन्ही शाळा प्राथमिक , माध्यमिक & उच्चमाध्यमिक विभाग मान्यताप्राप्त अनुदानित शाळा आहेत.
    आमच्या संस्थेच्या तिन्ही शाळा मिळून या शैक्षणिक वर्षात काही पदे रिक्त झाली आहेत पैकी प्राथमिक मुख्याध्यापक ,पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक पद रिक्त आहे.
    मी NT-D संवर्गात असुन माझ्या सेवेला जून २०२१ मध्ये 20वर्षे पूर्ण होत आहे. माझी शैक्षणिक पात्रता BA मराठी & व्यावसायिक पात्रता Ded English आहे.
    माझ्यापेक्षा सेवेने ज्येष्ठ असलेले शिक्षक Open & OBC संवर्गाचे आहेत.
    वरील रिक्त असलेल्या पदावर मला आरक्षणानुसार पदोन्नती मिळु शकेल का ? कि सेवाज्येष्ठतानुसार माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांना पदोन्नती मिळेल ?
    कृपया आपण मार्गदर्शन करावे.����
    कृपया खालील mob वर Hii म्हणून whatsapp करावे ही विनंती.
    8999862502
    आपल्याला सविस्तर माहिती देता येईल.
    धन्यवाद सर����

    ReplyDelete
  35. सर मी एका शाळेत २००१ डी. एड. श्रेणी वर सेवेत रुजू झालेले 2011 ला मी बीएड पूर्ण केले .2021 ला मला बीएड श्रेणी संस्था देणार आहे .माझी शाळा इयत्ता पाचवी ते बारावी असून ही पदोन्नती अकरा बारावीसाठी ग्राह्य धरता येईल का माझे एम ए बी एड शिक्षण आहे मार्गदर्शन करावे शिवाय बीएड स्केल कोण़त्या वर्षापासून मिळणार की पदोन्नतीच्या दिनांकापासून मिळणार.

    ReplyDelete
  36. सर मी एका शाळेत २००१ डी. एड. श्रेणी वर सेवेत रुजू झालेले 2011 ला मी बीएड पूर्ण केले .2021 ला मला बीएड श्रेणी संस्था देणार आहे .माझी शाळा इयत्ता पाचवी ते बारावी असून ही पदोन्नती अकरा बारावीसाठी ग्राह्य धरता येईल का माझे एम ए बी एड शिक्षण आहे मार्गदर्शन करावे शिवाय बीएड स्केल कोण़त्या वर्षापासून मिळणार की पदोन्नतीच्या दिनांकापासून मिळणार.

    ReplyDelete
  37. Phone no 72767874 what's up message kar sir

    ReplyDelete
  38. बीएड स्केल पदोन्नतीच्या दिनांकापासून मिळेल. या दिनांकापासून आपणास पदोन्नती दिले जाईल त्या दिनकापासून मिळेल

    ReplyDelete
  39. सर मी विनाअनुदानित शिक्षक आहे ,11 वी व 12 वी ला अध्यापन करतो ,माझी मान्यता 2014 ची आहे ,माझं नाव सेवा जेष्ठता यादीत येईल का?

    ReplyDelete
  40. श्री शंकर विष्णू जाचक सर मी BEd असताना मी 7/1/1999 ला DEd वेतन श्रेणी वर माझी संस्थेने रिक्तपदी नियुक्ती केली तद्नंतर मला 2012 ला मला BEd वेतन श्रेणीवर घेतले परंतु आमच्या संस्थेत एक व्यक्ती बाहेरच्या संस्थेतून अतिरिक्त होऊन आमच्या संस्थेत 2008 ला रुजू झाला तर सेवाजेष्ठता यादी बनविताना तो व्यक्ती अघोधर असेल का मी ह्या संदर्भात एखादा जीआर असेल तर माझ्या व्हॉट्सऍप नंबर 9922346690 ह्याच्यावर पाठविला तर खूप बरे होईल कारण आमच्या संस्थेची मिटिंग ये त्या दोन दिवसात होणार आहे तर शंका दूर होण्यासाठी प्लिज पाठवा

    ReplyDelete
  41. माझा नियुक्ती दिनांक 8/7/1992आहे मला सदर दिवशी probetional order मिळाली आहे, दुसरे शिक्षक chb, parttime order दिनांक 1/7/1992आहे एकाच संस्थेतील आम्हा दोघांपैकी sineear कोन मार्गदर्शन मिळावे




    ReplyDelete
  42. सर माझी नियुक्ती खाजगा प्राथमिक शाळेत 1/7/1996 साली आहे बी.ए.1997 झाले व बी.एड2005 ला झाले व त्याच संस्थेत बी.एड स्केलवर 2007 ला मिळाले आहे एकाच संस्थेत नोकरी झाली आहे तर मला सेवाजेष्टता2007 धरली आहे तरी मला योग्य मार्गदर्शन वहावे किंवा शासन निर्णय असेल तर मिळावा ही विनंती माझा हॉटसप फोन नंबर9423809903 आहे

    ReplyDelete
  43. शिक्षण संस्था अजुनही याची अंमलबजावणी करत नाहीत.

    ReplyDelete
  44. सर मी BSc Bed असून मला 2018 साली जून 2012 पासून मान्यता मिळाली जून 2015 पासून नियमित सह.शिक्षक म्हणून कार्यरत आहे.ऑक्टोबर 2015 मध्ये अतिरिक्त शिक्षकांचे आमच्या शाळेत समायोजन झाले आहे.त्याना सेवाज्येष्ठता यादीमध्ये वरील क्रमांक दिला असून मला त्याच्या नंतरचा क्रमांक दिला आहे कृपया मार्गदर्शन करा.

    ReplyDelete
  45. माझी नियुक्ती 2004 मध्ये संस्थेच्या विनाअनुदानित शाळेत झालेली आहे. तत्पूर्वी 2002 मध्ये अनुदानित शाळेवर बी.पी.एड्. शिक्षकांची अर्धवेळ पदावर नियुक्ती करण्यात आली. 2005 मध्ये सदर शिक्षकाला पूर्णवेळ नेमणुक देण्यात आली.संस्थेने 2018 मध्ये कुठलासा नियम लावून अर्धवेळ शिक्षकास पूर्णवेळ म्हणून सेवाज्येष्ठता यादीत माझ्या अगोदर दाखवले आहे. 2022 मध्ये अनुदाने शाळेवर मुख्याध्यापक पद रिक्त होत आहे ज्यावर माझी नियुक्ती होणार होती ती या अर्धवेळ शिक्षकामुळे अडचणीत आली आहे. अर्धवेळ शिक्षकाला दोन अर्ध वेळ वर्ष गृहीत धरून सेवा जेष्ठ बनवता येते का? नसल्यास तसे एखादे कागदपत्र असल्यास 9326981606 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवून देणे व मार्गदर्शन करावे.🙏🙏🙏

    ReplyDelete
  46. 20 मार्च2012 चा D ED to B. ED promoshion चा GR उपलब्ध होईल का?

    ReplyDelete
  47. सर मी 1998 मध्ये बी.एड.झालो.माझी नियुक्ती संस्थेने 1998 या वर्षी झाली.परंतु माझ्या पदला मान्यता 2000 या वर्षी मिळाली.परंतु काही लोकांचे bed माझ्या नंतर चे आहे.माझी निवृत्ती सर्वात आधी आहे मी मुख्याध्यापक पदा साठी लायक ठरेल काय ?

    ReplyDelete
  48. नमस्ते सर.संन १९९७ ला ३ शिक्षक कामावर रुजू झाले.तर सेवा ज्येष्ठता.कशी असेल.

    ReplyDelete