मित्रहो, कार्यक्रम सुरु करताना *सूत्रसंचालक* म्हणून तुमच्याजवळ संहिता असणे गरजेचे आहे. त्या कार्यक्रम पत्रिकेचा नमुना साधारणपणे खालीलप्रमाणे असावा.
*कार्यक्रम पत्रिका*
दि..../... /....
*यजमान (आयोजक )संस्थेचे नाव* ( थोडक्यात )
*मुख्य कार्यक्रमाचे शीर्षक* ( ठळक )
*पाहुण्यांचे मंचावर आगमन*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष* ( नाव लिहावे )
*उद्घाटक* ( नाव )
*प्रमुख अतिथी*
सर्वांची नावे
1
2
3
*प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन*( मंचावरील सर्वांना निमंत्रित करावे. )
*स्वागत गीत पाहुणे व श्रोत्यांसाठी*( संचप्रमुख व चमु)
*स्वागत समारंभ* ( स्वागताचे स्वरुप : शाल, श्रीफळ, पुष्पहार, ग्रंथ, सन्मानचिन्ह यापैकी जे असेल त्याचा उल्लेख करावा )
*सत्कारमूर्ती* *हस्ते*
-अध्यक्ष ........
-उद्घाटक .........
-अतिथी ..........
-.......... ........
*प्रास्ताविक* ( व्यक्ती नाव )
*पुस्तक प्रकाशन/अनावरण/ विमोचन/लोकार्पण असे काही असल्यास त्याचा येथे समावेश करावा.*
*प्रमुख पाहुण्यांचे मनोगत* यामध्ये प्रमुख वक्त्यांचे भाषण शेवटी ठेवावे.
1
2
3
*अध्यक्षीय भाषण*
*आभारप्रदर्शन* ( व्यक्ती नाव )
*कार्यक्रमाची सांगता*( राष्ट्रगीत, राष्ट्रवंदना,पसायदान यापैकी कशाने होईल याची घोषणा करावी.)
*सूत्रसंचालकाचे नाव*
*सूत्रसंचालन* करताना आवश्यक तेथे सुभाषिते, श्लोक, कविता, चारोळी , शेरोशायरी यांचा अंतर्भाव केला जावा. आवश्यकतेप्रमाणे कार्यक्रम पत्रिकेत बदल करावा.
*क्रमशः*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1
*"हरवले आभाळ ज्यांचे,*
*हो तयांचा सोबती,*
*सापडेना वाट ज्यांना,*
*हो तयांचा सारथी,*
*साधना करिती तुझी जे,*
*नित्य तव सहवास दे......*
*जे सत्य सुंदर सर्वथा,*
*आजन्म त्याचा ध्यास दे,*
*तू बुध्दी दे, तू तेज दे,*
*नवचेतना,विश्वास दे............"*
- गुरु ठाकूर
2
*"सूर्यकुलाशी ज्यांचे नाते, त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे ,पहाटेचा गाव न्यावा "*
-दत्ता हलसगीकर
स
No comments:
Post a Comment