Monday, 19 March 2018

Friday, 9 March 2018

माझी मराठी

*माय मराठी*
                        ✍🏼  श. गार्डी

*माझ्या मराठीची थोरवी*
*कशी वर्णू मी शब्दांत,*
*आईपरि स्थान तिचं*
*जपलेलं ह्दयात ...*

*संत-कवी-साहित्यीकांची*
*कितीतरी मांदियाळी,*
*मायमराठीची सेवा*
*लिहलेली त्यांच्या भाळी...*

*शब्दाशब्दांतून पाझरे*
*मायाममतेचे झरे,*
*किती करु कौतुक*
*हाती शब्द न उरे...*

*माझ्या मराठीचा वेलू*
*गगनाला गेला,*
*परि मुळापाशी इंग्रजीनं*
*घातला अलगद घाला...*

*माझ्या मराठीचा वाजे*
*अवघ्या जगामंधी डंका,*
*परकीय भाषेची*
*चला पेटवूया लंका...*

*मराठीला जपणं*
*आहे तुझ्याचं रे हाती,*
*ध्यानी ठेवून जपूया*
*जन्मोजन्मीची रे नाती...*

*मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !*

सेवा जेष्टता

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई* कडून सर्व *पदवीधर डी. एड् शिक्षकांना आवाहन*

*मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने  दि१४-११-२०१७  चे परिपत्रका नुसार सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतचा स्पष्टीकरणात्मक काढलेला आदेश व अनुसुची "फ" बाबत*
*स्पष्टीकरण आपल्या आकलनासाठी देत आहोत .........*
*मुद्दा क्र.1* --  ज्या दिवशी SSC DEd शिक्षक हे *BA*पदवी धारण करतील , त्याच दिवशी ते *B. A. BEd स्केल साठी पात्र होतील.फ़क्त सदर शाळा / संस्था मध्ये प्रशिक्षित पदवीधर म्हणजे B. Ed. चे पद रिक्त असणे आवश्यक आहे.मात्र पद अथवा वेतनश्रेणी तसेच वरचे वर्ग अध्यापनासाठी मिळाले नाहीत तरी अशा पदवीधर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळू शकते. हे मा. न्यायालयीन निर्णयानुसार सिद्ध झाले आहे. दि. 13/10 /2016 च्या शासननिर्णयानुसार पदवीधर याचा अर्थ कोणत्याही शाखेतील पदवी अधिक  D. Ed.  किंवा B. Ed. असा आहे, हे स्पष्टपणे नमूद केले आहे. म्हणजेच पदवीधर डी. एड्. शिक्षक हा बी. एड्. समकक्ष* समजला जातो.
*मुद्दा क्र.2* --  इयत्ता  ५ वी ते 10 वीचे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळेत  / संस्थेत सेवेत असणार्‍या सर्वच डी. एड्. व बी. एड् सह रुजू होणार्‍या सर्वच शिक्षकांची एकच एक प्रथम नेमणूक दिनांकानुसार जेष्ठता यादी बनवावी , ह्याच यादीनुसार जो जेष्ठ शिक्षक त्यास उपमुख्याध्यापक /मुख्याध्यापक पदी पदोन्नति द्यावी. DEd साठी BA कधी केले अथवा BEd स्केल कधी मिळाले महत्वाचे नाही , कारण schedul B प्रमाणे SSC D. Ed हे सहा.शिक्षका साठी full fill qualification आहे .दि. *24/1/2017 च्या शासननिर्णयानुसार पदवीधर शिक्षकांच्या जेष्ठतासूचीबाबत मुद्दा क्रमांक 2 मध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षकांची जेष्ठता यादी करताना मूळ नियुक्ती दिनांकानुसार जेष्ठता निश्चित करावी, हे स्पष्टपणे नमूद केले आहे*
*मुद्दा क्र.3* -- प्रमाणे पदोन्नती साठी SSC. D. Ed शिक्षकांनी B. A. /B. Com. /B. Sc. पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. B. Ed. पदवी केव्हा प्राप्त केली हे महत्वाचे नाही.*नेमणूक दिनांक पदोन्नतीसाठी महत्वाचा आहे*.
*मुद्दा क्र.4*-- प्रमाणे प्राथमिक शिक्षक (SSC DEd ) हा पदवी प्राप्त केल्या दिनांका पासून प्रशिक्षित पदवीधर म्हणून समजला जाईल .तसेच त्याचा अखंड सेवेतील  मुळ नियुक्ती दिनांकच (DEd/BEd) त्याचापदोन्नतीसाठी जेष्ठतेचा दिनांक असेल.
*मुद्दा क्र.5* -- शिक्षक संवर्ग - - इयत्ता 5 ते 10 - तसेच 12वी  वर्ग असणारी माध्यमिक शाळेतील  (D. Ed/B.Ed) प्रथम नियुक्ति व अखंड सेवा प्रमाणे असणारी सामाईक जेष्ठता यादी ( D. Ed/B. Ed ) अर्हता असणारे सर्व  इयत्तांना (5 ते ई.10 -- 12 ला) शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची.सदर जेष्टता यादी ही फ़क्त नेमणूक दिनांक प्रमाणेच करावी.म्हणजे ज्याची नेमणूक आधी तो जेष्ठ असेल.( मग तो प्रथम नेमणूक वेळी D. Ed असो अथवा BEd) परंतु पदोन्नतीचे पद रिक्त होण्यापूर्वी तो , पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. (म. खा. शा. नियमावली 1981 नियम क्रमांक, 3 नुसार ) जो नेमणूक दिनांकाप्रमाणे जेष्ठ शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असेल.
*मुद्दा क्र.6*-- महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती 1981 च्या schedule F नियम 12 प्रमाणे 'क' संवार्गा साठी आवश्यक अर्हता -- B. A /B.COM/ B. Sc. /B. Ed
*अर्हता क्र.3* -- B. A /B. COM/ B. Sc/Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम)
*अर्हता क्र.4*-- B. A /B.COM/ B. Sc / S. T. C. / Dip.ed.( एक वर्षाचा अभ्यासक्रम किंवा तत्सम अभ्यासक्रम 'क' संवार्गात समाविष्ट होण्यासाठी 10 वर्ष सेवा होणे आवश्यक.
टीप क्रमांक -- 2  (पहाणे आवश्यक)
या टिप -- 2 चा संबंध अर्हता क्र. 3 शी आहे. यातील Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम) हा D. Ed (दोन वर्षांचा अभ्यासक्रम ) ला समकक्ष आहे.( टिप -- 2 पहा)
*अर्हता क्र.4* मधील व्यवसायिक पात्रता ही 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या 1 वर्ष अभ्यासक्रमलाच फ़क्त 10 वर्ष सेवेची अट आहे . दोन वर्ष सेवेसाठी नाही.(म्हणजे अर्हता क्र.3 ला नाही. टीप क्र. -- 2 पहा. *कारण टीप-- 2 प्रमाणे SSC नंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम हा प्रशिक्षणविषयक अर्हता असून जेष्ठतेच्या प्रयोजना साठी राहील हे स्पष्ट म्हटले आहे*.)
दुसरे असे, की महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने 1978 साली Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम) आणि STC , Dip.ed (एक वर्षाचा अभ्यासक्रम) हे बंद करून एकच D. Ed( दोन वर्षांचाअभ्यासक्रम) 1979 पासून सुरु केला आणि हा अभ्यासक्रम Dip.t ( दोन वर्ष अभ्यासक्रम ला समकक्ष आहे ( पहा -- टिप 2)
*मुद्दा क्र. 7* पदोन्नतीसाठी  इयत्ता 5 ते 10 किंवा 12  पर्यंत वर्ग असणार्‍या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेची(D. Ed. /B. Ed. ) एकच सामाइक सेवाजेष्ठता यादी नियुक्ती दिनांका प्रमाणे असावी.
प्रथम नियुक्ती दिनांक, अखंड सेवा पात्र असलेला शिक्षक मुख्याध्यापक पदी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल.
सदर GR हा D. Ed. /B. Ed नेमणूक दिनांका प्रमाणे जेष्ठतेबाबत मार्गदर्शक व परिपूर्ण आहे.या पूर्वी पदोन्नती देताना प्रथम बी. एड् झालेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्याची रूढ पद्धत बदलणार आहे. यापुढे सर्व पदोन्नती दि.१४-११-२०१७ च्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार होणे अपेक्षित आहे.या निर्णायाने मोठी उलथापालथ होत असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.भविष्यातील अनेक न्यायालयीन प्रकरणांना आळा बसेल. *