*५ सप्टेंबर शिक्षक दिन*
*नाही पंढरीशी जाणे , नाही केली कधी वारी !*
*माझी कर्मभूमी हिच , माझी रोजची पंढरी !!*
*माझा खडु - फळा - माझे , टाळ , विणा नी मृदंग*
*फुले ज्ञानाची घेउुन , रोज रंगतो अभंग !!*
*मन मोकळे कराया , जेव्हा येतात लेकर*
*त्यांच्या डोळ्यातलं पाणी , माझं चंद्रभागा तीर !!*
*त्यांचे दु:ख निवारुन , देतो दान आनंदाचे !*
*काही वेगळे आहे का , पुण्य देव दर्शनाचे !!*
*ज्ञानदानाचे हे व्रत , हीच माझी एकादशी !*
*माझ्या लेकराचं यश , माझे प्रयाग नी काशी !!*
*जेव्हा येतात लेकरं , सुख- दु:ख वाटायला !*
*त्यांच्या रुपाने विठ्टल , रोज येतो भेटायला !!*
*अखंड ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षणवारीतील वारकरी शिक्षक बंधु ,भगिनी यांना*
*शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...।*
No comments:
Post a Comment