Friday, 9 March 2018

सेवा जेष्टता

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई* कडून सर्व *पदवीधर डी. एड् शिक्षकांना आवाहन*

*मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने  दि१४-११-२०१७  चे परिपत्रका नुसार सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतचा स्पष्टीकरणात्मक काढलेला आदेश व अनुसुची "फ" बाबत*
*स्पष्टीकरण आपल्या आकलनासाठी देत आहोत .........*
*मुद्दा क्र.1* --  ज्या दिवशी SSC DEd शिक्षक हे *BA*पदवी धारण करतील , त्याच दिवशी ते *B. A. BEd स्केल साठी पात्र होतील.फ़क्त सदर शाळा / संस्था मध्ये प्रशिक्षित पदवीधर म्हणजे B. Ed. चे पद रिक्त असणे आवश्यक आहे.मात्र पद अथवा वेतनश्रेणी तसेच वरचे वर्ग अध्यापनासाठी मिळाले नाहीत तरी अशा पदवीधर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळू शकते. हे मा. न्यायालयीन निर्णयानुसार सिद्ध झाले आहे. दि. 13/10 /2016 च्या शासननिर्णयानुसार पदवीधर याचा अर्थ कोणत्याही शाखेतील पदवी अधिक  D. Ed.  किंवा B. Ed. असा आहे, हे स्पष्टपणे नमूद केले आहे. म्हणजेच पदवीधर डी. एड्. शिक्षक हा बी. एड्. समकक्ष* समजला जातो.
*मुद्दा क्र.2* --  इयत्ता  ५ वी ते 10 वीचे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळेत  / संस्थेत सेवेत असणार्‍या सर्वच डी. एड्. व बी. एड् सह रुजू होणार्‍या सर्वच शिक्षकांची एकच एक प्रथम नेमणूक दिनांकानुसार जेष्ठता यादी बनवावी , ह्याच यादीनुसार जो जेष्ठ शिक्षक त्यास उपमुख्याध्यापक /मुख्याध्यापक पदी पदोन्नति द्यावी. DEd साठी BA कधी केले अथवा BEd स्केल कधी मिळाले महत्वाचे नाही , कारण schedul B प्रमाणे SSC D. Ed हे सहा.शिक्षका साठी full fill qualification आहे .दि. *24/1/2017 च्या शासननिर्णयानुसार पदवीधर शिक्षकांच्या जेष्ठतासूचीबाबत मुद्दा क्रमांक 2 मध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षकांची जेष्ठता यादी करताना मूळ नियुक्ती दिनांकानुसार जेष्ठता निश्चित करावी, हे स्पष्टपणे नमूद केले आहे*
*मुद्दा क्र.3* -- प्रमाणे पदोन्नती साठी SSC. D. Ed शिक्षकांनी B. A. /B. Com. /B. Sc. पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. B. Ed. पदवी केव्हा प्राप्त केली हे महत्वाचे नाही.*नेमणूक दिनांक पदोन्नतीसाठी महत्वाचा आहे*.
*मुद्दा क्र.4*-- प्रमाणे प्राथमिक शिक्षक (SSC DEd ) हा पदवी प्राप्त केल्या दिनांका पासून प्रशिक्षित पदवीधर म्हणून समजला जाईल .तसेच त्याचा अखंड सेवेतील  मुळ नियुक्ती दिनांकच (DEd/BEd) त्याचापदोन्नतीसाठी जेष्ठतेचा दिनांक असेल.
*मुद्दा क्र.5* -- शिक्षक संवर्ग - - इयत्ता 5 ते 10 - तसेच 12वी  वर्ग असणारी माध्यमिक शाळेतील  (D. Ed/B.Ed) प्रथम नियुक्ति व अखंड सेवा प्रमाणे असणारी सामाईक जेष्ठता यादी ( D. Ed/B. Ed ) अर्हता असणारे सर्व  इयत्तांना (5 ते ई.10 -- 12 ला) शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची.सदर जेष्टता यादी ही फ़क्त नेमणूक दिनांक प्रमाणेच करावी.म्हणजे ज्याची नेमणूक आधी तो जेष्ठ असेल.( मग तो प्रथम नेमणूक वेळी D. Ed असो अथवा BEd) परंतु पदोन्नतीचे पद रिक्त होण्यापूर्वी तो , पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. (म. खा. शा. नियमावली 1981 नियम क्रमांक, 3 नुसार ) जो नेमणूक दिनांकाप्रमाणे जेष्ठ शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र असेल.
*मुद्दा क्र.6*-- महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती 1981 च्या schedule F नियम 12 प्रमाणे 'क' संवार्गा साठी आवश्यक अर्हता -- B. A /B.COM/ B. Sc. /B. Ed
*अर्हता क्र.3* -- B. A /B. COM/ B. Sc/Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम)
*अर्हता क्र.4*-- B. A /B.COM/ B. Sc / S. T. C. / Dip.ed.( एक वर्षाचा अभ्यासक्रम किंवा तत्सम अभ्यासक्रम 'क' संवार्गात समाविष्ट होण्यासाठी 10 वर्ष सेवा होणे आवश्यक.
टीप क्रमांक -- 2  (पहाणे आवश्यक)
या टिप -- 2 चा संबंध अर्हता क्र. 3 शी आहे. यातील Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम) हा D. Ed (दोन वर्षांचा अभ्यासक्रम ) ला समकक्ष आहे.( टिप -- 2 पहा)
*अर्हता क्र.4* मधील व्यवसायिक पात्रता ही 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या 1 वर्ष अभ्यासक्रमलाच फ़क्त 10 वर्ष सेवेची अट आहे . दोन वर्ष सेवेसाठी नाही.(म्हणजे अर्हता क्र.3 ला नाही. टीप क्र. -- 2 पहा. *कारण टीप-- 2 प्रमाणे SSC नंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम हा प्रशिक्षणविषयक अर्हता असून जेष्ठतेच्या प्रयोजना साठी राहील हे स्पष्ट म्हटले आहे*.)
दुसरे असे, की महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने 1978 साली Dip.t ( जुना दोन वर्षांचा अभ्यासक्रम) आणि STC , Dip.ed (एक वर्षाचा अभ्यासक्रम) हे बंद करून एकच D. Ed( दोन वर्षांचाअभ्यासक्रम) 1979 पासून सुरु केला आणि हा अभ्यासक्रम Dip.t ( दोन वर्ष अभ्यासक्रम ला समकक्ष आहे ( पहा -- टिप 2)
*मुद्दा क्र. 7* पदोन्नतीसाठी  इयत्ता 5 ते 10 किंवा 12  पर्यंत वर्ग असणार्‍या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेची(D. Ed. /B. Ed. ) एकच सामाइक सेवाजेष्ठता यादी नियुक्ती दिनांका प्रमाणे असावी.
प्रथम नियुक्ती दिनांक, अखंड सेवा पात्र असलेला शिक्षक मुख्याध्यापक पदी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल.
सदर GR हा D. Ed. /B. Ed नेमणूक दिनांका प्रमाणे जेष्ठतेबाबत मार्गदर्शक व परिपूर्ण आहे.या पूर्वी पदोन्नती देताना प्रथम बी. एड् झालेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्याची रूढ पद्धत बदलणार आहे. यापुढे सर्व पदोन्नती दि.१४-११-२०१७ च्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार होणे अपेक्षित आहे.या निर्णायाने मोठी उलथापालथ होत असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.भविष्यातील अनेक न्यायालयीन प्रकरणांना आळा बसेल. *

Wednesday, 28 February 2018

Logo

विज्ञान गीत

डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥धृ.॥
भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले
प्रारंभी जे अदभूत वाटे गहन, भितीदायी
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || १ ||
वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा
बीज पेरता कसे उगवते, पाऊस येई कसा
चारा चरूनी शेण होतसे, शेणाचे खत पिका
पीक पेरता फिरूनी चारा, चक्र कसे हे शिका
जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || २ ||
अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार
सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार
या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे
बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे
विज्ञानाची दृष्टी वापरा, स्पर्धेमध्ये टीका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका || ३ ||

Monday, 26 February 2018

माझी मराठी

*माय मराठी*
                        ✍🏼  श. गार्डी

*माझ्या मराठीची थोरवी*
*कशी वर्णू मी शब्दांत,*
*आईपरि स्थान तिचं*
*जपलेलं ह्दयात ...*

*संत-कवी-साहित्यीकांची*
*कितीतरी मांदियाळी,*
*मायमराठीची सेवा*
*लिहलेली त्यांच्या भाळी...*

*शब्दाशब्दांतून पाझरे*
*मायाममतेचे झरे,*
*किती करु कौतुक*
*हाती शब्द न उरे...*

*माझ्या मराठीचा वेलू*
*गगनाला गेला,*
*परि मुळापाशी इंग्रजीनं*
*घातला अलगद घाला...*

*माझ्या मराठीचा वाजे*
*अवघ्या जगामंधी डंका,*
*परकीय भाषेची*
*चला पेटवूया लंका...*

*मराठीला जपणं*
*आहे तुझ्याचं रे हाती,*
*ध्यानी ठेवून जपूया*
*जन्मोजन्मीची रे नाती...*

*मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !*

Wednesday, 24 January 2018

TV

*हजार तासांची घरातील शाळा*

*( जेष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा टि.व्ही आणि सोशल मिडियाचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतील लेख..)*                                                                      
शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा  १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या  शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या  अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ? ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!

१००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे  काळजीने बघत नाहीत.

याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या  दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात. तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियाच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ? या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी. 

टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट  किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती  आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे  वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.

आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते. ओरडणे, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?

ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये तयार होतो.

संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त  संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.

तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते 

*यावर उपाय काय?*

आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव, खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये.उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे, खेळणे. त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.

राजीव दीक्षित म्हणायचे की, राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही

*टीव्ही बंद अभियान*

जळगाव येथील कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत  महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध  माध्यमातून  या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट,व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार  विद्यार्थी, पालक यांना  वितरीत करतात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही, मोबाईल, इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.
महेश गोरडे  फोन नंबर ९४२०७८७१७३    

*२० सोनेरी वर्ष*

महेश गोरडे सांगतात की रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.

भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).

वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.

रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.

‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.

  ( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण) 

*हेरंब कुलकर्णी ९२७०९४७९७१*
ईमेल herambkulkarni1971@gmail.com